कोकण

चालक चहाला अन् कंटेनर दुकानात

CD

15358

चालक चहाला अन् कंटेनर दुकानात

बांद्यातील दुर्घटना; हातगाडीचा चक्काचूर, दुचाकीची हानी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः येथील बसस्थानकानजीक असलेल्या दुकानामध्ये कंटेनर घुसल्याने एकच खळबळ उडाली. कंटेनर चालक कंटेनर उभा करून चहा पिण्यास गेला होता. मात्र, कंटेनर अचानक चालू होऊन तीन दुकानांना धडक दिली. यात एका हातगाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद बांदा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
घटनास्थळाहून मिळालेली अधिक माहिती अशी, की मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा उड्डाणपुलाखाली सेवारस्त्यावर मुंबईच्या दिशेने कंटेनर उभा करून चालक चहा पिण्यासाठी निघून गेला. दरम्यान, उभा असलेला कंटेनर अचानक चालू होऊन रस्त्यालगत असणाऱ्या दुकानात घुसला. यात डंपरने एका दुचाकीला आणि दोन दुकानांच्या पत्र्यांना धडक दिली. डंपरच्या धडकेमुळे एका हातगाडीचाही चक्काचूर झाला.
या ठिकाणी दोन चहाची दुकाने असून, त्या दुकानात सकाळच्या वेळी ग्राहकांची मोठी गर्दी असते. पादचारी मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात रहदारीही सुरू असते; मात्र सुदैवाने आज सकाळी घटनास्थळी कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली. यात दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. याची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली. बांदा पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT