कोकण

रायपाटण खाडेवाडीचा सुपुत्र हरीओम शिंदेची भारतीय सैन्यामध्ये निवड

CD

rat३p१६.jpg-
२६O१५३३५
राजापूर ः भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हरिओम शिंदे याची मिरवणूक काढण्यात आली.
-----
रायपाटणचे हरिओम शिंदे सैन्यात दाखल
प्रशिक्षणानंतर गावात आगमन; मिरवणुकीत जल्लोषी स्वागत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः तालुक्यातील रायपाटण खाडेवाडीचा सुपुत्र हरिओम महादेव शिंदे याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली. त्यांनी आयटीबीपी, पॅरामिलिटरी फोर्स (आर्मी)चे अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते काल (ता. २) आपल्या गावी दाखल झाले. या वेळी श्री वडचीआई मंदिर ते होळीचा मांड अशी त्यांची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढत रायपाटणवासियांनी जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत केले.
तालुक्यातील रायपाटण खाडेवाडीचा सुपुत्र शिंदे यांची भारतीय सैन्यामध्ये निवड झाली आहे. या निवडीनंतर अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची अरुणाचल प्रदेश विभागात नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा शपथग्रहण सोहळाही पार पडला होता. त्यानंतर आपल्या रायपाटण गावी दाखल झाले. त्यांचे रायपाटणवासियांनी जल्लोषी वातावरणामध्ये जोरदार स्वागत केले. रायपाटण गावची ग्रामदेवता श्री वडचीआई देवीच्या मंदिरापासून होळीचा मांडपर्यंत त्यांची घोड्यावरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. वाजतगाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये फटाक्यांचीही जोरदार आतषबाजी करण्यात आली. या वेळी त्याच्यासमवेत त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि अन्य कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : २५ वर्षांचा काळा हिशेब, ६,३८१ शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करा - असीम सरोदे

Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

Mumbai Election Polls : अपक्षांचे फुटले पेव! पालिका निवडणुकीसाठी तब्बल ५५१ उमेदवार

Kolhapur ST : 'फोन पे–गुगल पे' ने बदलली एसटीची सफर; प्रवासीही खूश, महसूलही वाढला

SCROLL FOR NEXT