कोकण

सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय प्रश्नमंजुषा

CD

ratchl३२.jpg ः
२६O१५३६८
चिपळूण ः स्पर्धेतील विजेत्या सराफ हायस्कूलला गौरवताना पदाधिकारी.
----
शालेय प्रश्नमंजूषेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जय भवानी मित्रमंडळ, रोटरॅक्टचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः जय भवानी मित्रमंडळ घाणेखुंट व रोटरॅकट क्लब लोटे यांच्यावतीने एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. रोटरॅक्टचे सदस्य विक्रम पवार याच्या संकल्पनेतून पंचक्रोशीच्या शाळांमधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एकूण ७ शाळांमधील प्रत्येकी २ प्रमाणे १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा तीन फेरीमध्ये घेण्यात आली. प्रत्येक शाळेतील मुलांना पाच प्रश्न विचारण्यात आले. झटपट राऊंड, बझर सिस्टिम, बोनस राउंड अशा रंगतदार पद्धतीने अनेक शिक्षणप्रेमी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. ही स्पर्धा विक्रम पवार यांचे वडील कै. गजानन बाबू पवार यांच्या स्मरणार्थ भरवण्यात आली. ही स्पर्धा भरवून स्थानिक मुलांना एक वेगळी दिशा देऊन व्यासपीठ उपलब्ध व्हावे. शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल युगात शालेय पाठ्यपुस्तकात अधिक रस निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम घेतल्याचे पवार यांनी सांगितले. स्पर्धेत कविता विनोद सराफ विद्यालय शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT