कोकण

स्वच्छता अभियानात कलमठ प्रथम

CD

15394

स्वच्छता अभियानात कलमठ प्रथम

आरोग्य, पर्यावरण संरक्षणावर भर दिल्याने यश

कणकवली, ता. ४ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ अंतर्गत कणकवली तालुक्यातून कलमठ ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण या त्रिसूत्रीवर भर देत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे कलमठ गावाने हे यश प्राप्त केले आहे.
या अभियानांतर्गत कलमठ गावात हागणदारीमुक्त गाव, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा, ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन, तसेच घरगुती व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर यावर विशेष लक्ष देण्यात आले. गावातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पाणी साठ्यांची स्वच्छता व संरक्षण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविल्‍याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.
कलमठ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून काम करत असताना नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने विशेष आनंद होत आहे,’ अशी प्रतिक्रिया सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT