कोकण

सावित्रीबाई फुले यांचा मानवतावाद जपावा

CD

rat4p4.jpg-
15438
राजापूर ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नायब तहसिलदार दिपाली पंडीत. यावेळी उपस्थित प्रणाली रेडीड, डॉ. प्रा. राजाराम राठोड

सावित्रीबाई फुले यांचा मानवतावाद जपावा
दिपाली पंडीतः मराठे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मानवतावाद केवळ विचारांपुरता मर्यादित नव्हता, तर तो कृतीतून संघर्षातून आणि त्यागातून व्यक्त झाला आहे. त्यामुळे मानवतावादी समतेचा संकल्प करणे, हीच सावित्रीबाईंना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन कणकवली येथील नायब तहसिलदार दिपाली पंडीत यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, मंडळ अधिकारी प्रणाली रेडीज, कला शाखा प्रमुख डॉ. संजय मेस्त्री, सांस्कृतिक विभाग डॉ. राजेंद्र बावळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबू सोनार, स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. अतुल टिके आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमती रेडीज म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचे योगदान व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करून पदाधिकारी होऊन समाजात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा जपावा, असे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राठोड म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या सहकार्याने १८४८ मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळातील सामाजिक रूढी, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली अस्पृश्यता निर्मूलन बालहत्या प्रतिबंधगृह, विधवांसाठी आश्रयस्थाने, समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेले प्रयत्न हे आजही मार्गदर्शक ठरत आहेत.
याप्रसंगी नायब तहसिलदार सौ. पंडीत आणि श्रीमती रेडीज यांनी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. रजनी कुलकर्णी हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचिता टेमकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन देवयानी सारंग हिने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT