कोकण

पेंडूरकर, म्हात्रेंच्या संगीत संयोजनाचे पुण्यामध्ये कौतुक

CD

15470
संदीप पेंडूरकर, मनोहर म्हात्रे

पेंडूरकर, म्हात्रेंच्या
संगीत संयोजनाचे
पुण्यामध्ये कौतुक
आचरा ः पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये देशभरातील विद्यार्थी वादकांच्या लोकसंगीत वाद्य वादनाच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यातील संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर (शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण, सिंधुदुर्ग) आणि मनोहर म्हात्रे (संदेश विद्यालय, विक्रोळी, मुंबई) या दोघांनी यशस्वीरित्या पार पाडली. एनसीईआरटी दिल्ली व एससीईआरटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय कला उत्सवाचे आयोजन केले होते. स्वागतासाठी लोकसंगीत वाद्य वादनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची संधी पेंडूरकर व म्हात्रे यांना मिळाली. देशभरातून सहभागी झालेल्या या वाद्य वृंदामध्ये अनेक प्रकारची वाद्य वाजविली. सर्व मान्यवरांनी या वाद्यवृंदाचे विशेष कौतुक केले. श्री. पेंडूरकर व खारेपाटण विद्यालयाचे माजी विद्यार्थी मयूर जाधव यांची या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी देशभरातील संघांसाठी वादक साथीदार म्हणून निवड करण्यात आली. या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय सानप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक संतोष राऊत आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

SCROLL FOR NEXT