कोकण

रत्नागिरीत सप्रे स्मृती फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा

CD

rat4p1.jpg-
O15432
कै. रामचंद्र सप्रे

रत्नागिरीत सप्रे स्मृती फिडे
मानांकन बुद्धिबळ स्पर्धा
१६ पासून आयोजन; बुद्धिबळ संघटना, केजीएन सरस्वती फाऊंडेशनचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेतेपद पटकावणारे (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एच टू ई पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य निवड (अमॅच्युअर ग्रुप) फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना, केजीएन सरस्वती फाऊंडेशनच्यावतीने ही स्पर्धा येत्या १६ ते १८ जानेवारीदरम्यान माळनाका येथील मराठा भवन मंगल कार्यालयात होणार आहे.
स्पर्धेत रोख रक्कम, चषक अशा स्वरूपात विविध वयोगट, रेटिंग कॅटेगरी आणि महिला व वरिष्ठ खेळाडू अशा गटांत बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावर्षी क्लासिकल टाइम कंट्रोल प्रकारात आयोजित करण्यात येत असलेली ही रत्नागिरीच्या बुद्धिबळ इतिहासातील पहिलीच फिडे मानांकन स्पर्धा आहे. मुळचे रत्नागिरीचे (कै.) सप्रे यांच्या विराट कार्याला आदरांजली म्हणून दिलीप नवरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला २०१३ मध्ये सुरवात झाली. के. जी. एन सरस्वती फाउंडेशन, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, चेसमेनचे (कै.) दिलीप टिकेकर व प्रसन्न आंबुलकर यांच्या अथक प्रयत्नांनी ही स्पर्धा नावारूपाला आली.
रामभाऊ सप्रे यांच्या कार्याला दंडवत म्हणून आम्ही गेली ११ वर्षे सलग या स्पर्धेला सहकार्य करत आलो असून यापुढेही ही स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे माधव हिर्लेकर यांनी सांगितले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांच्याशी संपर्क साधावा.

कोट
कोणत्याही बुद्धिबळ खेळाडूच्या आयुष्यात फिडे मानांकन मिळवणे हा पुढील वाटचालीसाठी पहिला टप्पा असतो. आपले खाते जागतिक गुणतालिका स्तरावर उघडून त्यात जितकी जास्त भर तो खेळाडू घालतो तितका तो नावाजला जावू लागतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि आपला कस पणाला लावून फिडे मानांकन मिळवावे.
- श्रीराम खरे, अध्यक्ष,
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT