कोकण

कुडाळात रिसर्च सेंटरसाठी प्रयत्नशील

CD

15501

कुडाळात रिसर्च सेंटरसाठी प्रयत्नशील

आमदार नीलेश राणे ः डॉ. सुरवसेंच्या ‘ज्ञानज्योती १२-विज्ञान वीरांगना’ पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ : शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मातीचे आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. डॉ. स्मिता सुरवसे यांनी महाविद्यालयात रिसर्च सेंटर सुरू करण्याची केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ - विज्ञान वीरांगना’ या पुस्तकाचे प्रकाशन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आमदार राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाहक आनंद वैद्य, महेंद्र गवस, ॲड. सुहास सावंत यांच्यासह लेखिका डॉ. स्मिता सुरवसे उपस्थित होत्या.
डॉ. सुरवसे यांनी, ‘आपण आज ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. विज्ञान क्षेत्रात बारा महिला वीरांगनांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असतानाही त्यांना आजवर अपेक्षित पुरस्कार मिळाले नाहीत, ही खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा. संतोष वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी आभार मानले.
---------------------
गावातल्या नात्याशी निष्ठा राखा!
आमदार राणे म्हणाले, ‘अशा प्रकारचे पुस्तक लेखन करून समाजाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. सुरवसे यांनी केले आहे. विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिला आजही समाजासमोर पुरेशा प्रमाणात येऊ शकल्या नाहीत. अशा महिलांना समाजापुढे आणण्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे. आपले शिक्षण आणि व्यवसाय समाजासाठी तसेच आपल्या मातीसाठी उपयोगी पडला पाहिजे. शहरी व ग्रामीण भागातील शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या गावाशी आणि मातीतल्या नात्याशी निष्ठा राखली पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT