कोकण

पोलिसांचे कामकाज समजून घ्या

CD

15503

पोलिसांचे कामकाज समजून घ्या

श्रद्धा भोसले ः सावंतवाडीत पोलिस स्थापना दिन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः पोलिस दल हे २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी व सेवेसाठी तत्पर असते. पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्रे तसेच पोलिस दलाच्या कार्यपद्धतीची माहिती अभ्यासपूर्ण दृष्टीने घ्यावी आणि भविष्यात देशसेवेसाठी स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले.
महाराष्ट्र पोलिस दलातर्फे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘पोलिस स्थापना दिन सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात पोलिस दलातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती देणारे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले.
नागरिक व विद्यार्थ्यांना पोलिस दलाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती व्हावी, यासाठी या ठिकाणी विविध माहितीपूर्ण स्टॉल्स उभारले आहेत. सायबर सेलच्या माध्यमातून वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS) कडून स्फोटकांचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे व कार्यपद्धतीची माहिती दिली. भरोसा सेल व वाहतूक विभागाच्या स्टॉलवर महिला व बालकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच पोलिस वाद्यवृंद (बँड पथक) यांचे सादरीकरणही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. उद्‍घाटनप्रसंगी युवराज लखमराजे भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, श्री. लोहकरे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT