कोकण

चिपळुणात आजपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव

CD

चिपळुणात आजपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव
नऊ जानेवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रम ; अवधूत गुप्ते, अशोक हांडेंची मैफल रंगणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः चिपळूणमधील वाशिष्ठी कृषी महोत्सवात यंदाही नवचैतन्य, नवी ऊर्जा आणि अस्सल मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळणार आहे. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत संगीत, भक्ती, शौर्य, निष्ठा आणि मनोरंजन यांचा हृदयाला भिडणारा संगम रसिकांना दररोज रात्री अनुभवता येणार आहे.
वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित वाशिष्ठी कृषी महोत्सव यंदा अधिक भव्य, अधिक भावस्पर्शी आणि अधिक प्रेरणादायी स्वरूपात साजरा होणार आहे. ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता विघ्नहर्ता ढोलपथक, मुकुंद गुरव तुतारी वादक आणि छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर येथील गणेश कदम यांचा पारंपारिक वाद्यांचा गजर, तुतारीचा नाद आणि मर्दानी खेळांची रोमांचक अनुभूती देणारा ‘पारंपरिक वाद्य व स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा’ हा एकत्रित कार्यक्रम रंगणार आहे. ६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता जनावरांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता हरिपाठ रंगणार आहे. रात्री ८ वाजता कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘वारी’ हा भक्तिरसाने ओथंबलेला कार्यक्रम रसिकांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता मांजरप्रेमींसाठी आकर्षण ठरलेल्या कॅट शोचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन आयोजित केले आहे. रात्री ८ वा. कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम होणार आहे. ८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता डॉग शो होणार असून सायंकाळी ६ वाजता भजनात तल्लीन होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांच्या बहारदार सुरांनी महोत्सवाचा परिसर दुमदुमून जाणार आहे.

चौकट
‘आवारा हूँ’ लाईव्ह शो
महोत्सवाचा समारोप ९ जानेवारीला रात्री आठ वाजता, प्रसिद्ध संगीतकार अशोक हांडे यांच्या ‘आवारा हूँ’ या लाईव्ह शोद्वारे होणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT