कोकण

आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य निर्माण करा

CD

rat५p५.jpg-
P२६O१५६४०
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. आदिती कोकजे. डावीकडून मनस्वी लांजेकर, उमा जोशी, प्रा. सुनील गोसावी आदी.
----
मुलींमध्ये ‘नकार’ देण्याची ताकद हवी
प्रा. उमा जोशी ः अभ्यंकर महाविद्यालयात बालिका दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : मुलींना योग्य ठिकाणी नकार देण्याची ताकद निर्माण करण्यासाठी आत्मबळ निर्माण करणे गरजेचे आहे. शिक्षण घेणं, समृद्ध होणं, नोकरी करणे आणि घर सांभाळताना योग्य समतोल साधणे हे देखील गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत शिक्षण थांबता कामा नये यासाठी सतत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करा, असे प्रतिपादन प्रा. उमा जोशी यांनी केले.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी त्या सुशिक्षित स्त्रियांपुढील आव्हाने या विषयावर बोलत होत्या. त्यांनी महिलांना कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये वावरताना येणाऱ्या अडचणी, बस, रेल्वे तसेच अन्य सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना निर्माण होणारे प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांना आवाहन केलं.
दिनविशेष समारंभ समिती प्रमुख प्रा. मनस्वी लांजेकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि स्त्रीशिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी स्त्री सबलीकरणाबरोबरच मुलींना आपल्या अधिकार, हक्क आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रा. आदिती कोकजे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. रोशनी हळदवणेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT