कोकण

मळेवाड येथे आज ''धन्वंतरी''चे उद्घाटन

CD

15737

मळेवाड येथे आज
‘धन्वंतरी’चे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ५ ः मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील रुग्णांकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचे उद्‍घाटन उद्या (ता. ६) डॉ. सागर रेडकर (हृदयरोगतज्ज्ञ, रेडकर हॉस्पिटल, धारगळ-पेडणे, गोवा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामविकास अधिकारी भालचंद्र सावंत, सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी उपस्थित डॉक्टरकडून करण्यात येणार आहे. यासाठी रेडकर रिसर्च सेंटरचे डॉ. सागर रेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे सरपंच पार्सेकर, उपसरपंच मराठे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, मधुकर जाधव, कृषिसेवक अमित नाईक या शिष्टमंडळाला डॉ. रेडकर यांनी सांगितले. गावातील गोरगरीब रुग्णांकरिता हे केंद्र लाभदायी ठरणार असल्याने ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT