कोकण

''आदर्श सरपंच सन्मान'' गुणाजी गावडेंना प्रदान

CD

swt525.jpg
15718
अहिल्यानगर : मान्यवरांच्या उस्थितीत पुरस्कार स्वीकारतांना वेत्ये सरपंच गुणाजी गावडे.

‘आदर्श सरपंच सन्मान’
गुणाजी गावडेंना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी गावडे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. गावडे यांनी सरपंचपदाच्या माध्यमातून वेत्ये गावाच्या विकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. गावासाठी त्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या या उत्तम कार्यातून अलीकडेच ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशाच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये वेत्ये ग्रामपंचायतीचा सहभाग नोंदवला आहे.
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गावाचे नाव राज्यपातळीवर नेले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव बाबासाहेब पावसे, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT