कोकण

आशा, आरोग्य परिचारांच्या समस्या ''जैसे थे''च

CD

swt535.jpg
15767
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच महिला आरोग्य परिचारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

आशा, आरोग्य परिचारांच्या समस्या ‘जैसे थे’च
जिल्हा प्रशासनास निवेदन; मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा कणा असलेल्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच महिला आरोग्य परिचारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा महिला परिचर युनियन यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन व सिंधुदुर्ग जिल्हा महिला परिचर युनियन संघटनेच्या अध्यक्षा विजयाराणी पाटील, प्रियांका तावडे, वर्षा परब, मानसी सावंत, रक्षदा तळवणेकर आदी उपस्थित होत्या. सीईओ व आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आशा व गटप्रवर्तक या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असताना त्यांना अनेक तांत्रिक, आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले.
मात्रा अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटी, नेटवर्कअभावी होणाऱ्या अडचणी, अपुरे प्रशिक्षण, कुष्ठरोग सर्वेक्षणासाठी स्वयंसेवक न मिळणे, मोबाईल भत्ता, एटीपी नियोजनातील विरोधाभास, मानधन उशिरा मिळणे, आदी प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच महिला आरोग्य परिचारांच्या निवेदनात अत्यल्प मानधन, कामाची स्पष्ट रूपरेषा नसणे, अतिरिक्त कामांची सक्ती, प्रवास व स्वच्छतेसाठी भत्ता नसणे, वेळेवर मानधन न मिळणे, अर्धवेळ नेमणूक असूनही दिवसभर काम करून घेणे आदी समस्यांचा उल्लेख करण्यात आला.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किमान मानधन, रजा, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी, वार्षिक युनिफॉर्म भत्ता व दिवाळी भेट देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. या दोन्ही संघटनांनी वर्षातून किमान तीन वेळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT