कोकण

वैभववाडी महाविद्यालयात आज ''तणाव व्यवस्थापन'' कार्यशाळा

CD

रावराणे महाविद्यालयात आज
‘तणाव व्यवस्थापन’ कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ ः येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात उद्या (ता. ८) ‘तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक तणाव हाताळण्याच्या प्रभावी पद्धती तसेच आत्महत्येपासून प्रतिबंधासाठी आवश्यक जनजागृती या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बिना शेटे-कळबंटे, पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे प्रा. राजेंद्र शिंत्रे हे तणाव ओळखणे, त्यावर उपाययोजना, सकारात्मक जीवनशैली, समुपदेशनाचे महत्त्व व आत्महत्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक उपस्थित राहणार असून, कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एम. गुलदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अपघाताचा थरार, कार डिव्हायडरला धडकली

Billionaires: वयाच्या 22 व्या वर्षीच भारतीय पठ्ठाने मोडला मार्क झुकरबर्गचा विक्रम! बनला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

SCROLL FOR NEXT