कोकण

जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा

CD

माखजनमध्ये सुगम संगीत स्पर्धा
१ फेब्रुवारीला आयोजन ; आयोजनाचे हे तिसरे वर्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन, ॲड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल सरंद येथे जिल्हास्तरीय, आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.
प्रशालेतील कै. पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षाच्या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे. या वेळी संगीतक्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑफलाईन पद्धतीने व्हिडिओ मागवून करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ६ मिनिटाचा नमूद केलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. ही स्पर्धा २ गटात होणार आहे. लहान गटात ५वी ते ८वीपर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत. यासाठी प्रथम क्रमांकाला ४ हजार, द्वितीय २ हजार ५००, तृतीय १ हजार ५०० व उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. मोठ्या गटात नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत. यातील विजेत्यांना ५ हजार, ४ हजार, ३ हजार रुपये रोख आणि उत्तेजनार्थ व्यक्तीला १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
संगीत स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी १८ जानेवारीपर्यंत व्हिडिओ पाठवा, असे आवाहन केले आहे. प्राथमिक फेरीतून प्राथमिक गटात ७ व मोठ्या गटात ७ स्पर्धक अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहेत. व्हिडिओमध्ये नाट्यसंगीत वगळून, अभंग, भावगीत, भक्तिगीत आदी एका प्रकारातील गीत सादर करावे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धेतील अधिक माहितीसाठी व व्हिडिओ पाठवण्यासाठी संतोष कुलकर्णी, ओंकार नामजोशी , ओंकार मुळये या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT