कोकण

साडवलीत सुरक्षेसाठी बसवले सीसीटिव्ही कॅमेरे

CD

साडवलीत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
ग्रामपंचायतीचा पुढाकार; चोऱ्यांमुळे निर्णय
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ७ ः देवरूखनजीकच्या साडवली ग्रामपंचायतीच्यावतीने साडवली परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
साडवली परिसरात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत घरफोडीचे काही प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याच्या तक्रारीही ग्रामपंचायतीकडे प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत साडवली परिसरातील सह्याद्रीनगर तिठा, साडवली स्टॉप, ठाकरे हायस्कूल स्टॉप अशा वर्दळीच्या व संवेदनशील ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे या भागातील वाहतूक, नागरिकांची ये-जा तसेच संशयास्पद हालचालींवर सतत नजर ठेवणे शक्य होणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता साडवली परिसरातील चार प्राथमिक शाळांमध्येही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेच्या आवारात घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येणार असल्याने पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढली आहे.
या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडून साडवली परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी करडी नजर ठेवली जाणार आहे. भविष्यात गुन्हेगारी घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. गरज भासल्यास पोलिस प्रशासनालाही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिक, पालक व व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत असून, सुरक्षित साडवलीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT