कोकण

कलाकार मारुतीराव कीर, रोहनराजला श्रद्धांजली

CD

-rat७p१०.jpg-
P२६O१६०९८
रोहनराज सावंत, मारुतीराव कीर.
----
कलाकार कीर, सावंत यांना श्रद्धांजली
‘स्मृतिगंध’; रविवारी सावरकर नाट्यगृहात मैफलीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : रत्नागिरीचे सुपुत्र, प्रसिद्ध ऱ्हिदम अॅरेंजर (कै.) मारुतीराव कीर आणि त्यांचे नातू (कै.) रोहनराज सावंत यांच्या स्मृतीनिमित्त ‘कलाप्रेमी’तर्फे ‘स्मृतिगंध’ या विशेष सांगितिक मैफलीचे आयोजन केले. या मैफलीमध्ये दिग्गज संगीतकार एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांना ज्यांनी आपल्या लयीने सजवले अशा मारुतीराव कीर यांनी ऱ्हिदम दिलेल्या निवडक मराठी व हिंदी गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
येत्या रविवारी (ता. ११) सायंकाळी ६.३० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. दिनकर सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. मैफलीमध्ये प्रसिद्ध कलाकार म्हणून शैलजा सुब्रमण्यम्, कोमल कृष्णा, रवींद्र शिंदे आणि चिराग पांचाळ सहभागी होणार आहेत. त्यांना सचिन सावंत, ब्रिजेश शहा, सुमीत सरफरे, सागर साठे, किरण गायकवाड, विनोद देवरे, हिमकर कांबळे, साईराज शिखरे आणि भीमसेन कोठाळ हे कलाकार साथसंगत करणार आहेत. प्रसिद्ध ऱ्हिदम कलाकार अनुपम घटक आणि रत्नागिरीचे सुपुत्र विजय शिवलकर कला सादर करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. याचे प्रवेश पास सावरकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT