कोकण

जीर्ण जलवाहिनी अखेर बदलली

CD

16211

जीर्ण जलवाहिनी अखेर बदलली

सावंतवाडी-संचयनी परिसराला आता स्वच्छ पाणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः शहराची मुख्य बाजारपेठेत संचयनी परिसरातील १० कुटुंबांना दीड महिन्यांपासून होणारा गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न नवनिर्वाचित नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी मार्गी लावला. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत त्यांनी ही जुनी जलवाहिनी बदलून नवीन लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले.
​मुख्य बाजारपेठेतून गेलेली नळपाणी पुरवठा वाहिनी अत्यंत जीर्ण झाली होती. ती फुटल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत होते. यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाणी मिळत होते. पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्याने याच पाण्याचा वापर करावा लागत असल्याने अनेक नागरिक आजारी पडले होते. ​पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग सहामधील रहिवाशांनी सूर्याजी यांच्याकडे ही कैफियत मांडली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला तत्काळ याची कल्पना दिली होती. निवडणूक जिंकल्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी सात दिवसांत प्रशासनाकडून पाठपुरावा करून मुख्य बाजारपेठेतील ही लाईन बदलली. मंगळवारपासून या कुटुंबांना आता स्वच्छ पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे.
​मुख्य बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे मोठे आव्हान होते. हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक सुर्याजी आणि पालिका प्रशासनाचे आभार मानले. या कामासाठी सहकार्य करणारे पाणी पुरवठा विभागाचे संजय पोईपकर, अभियंते दिनेश बर्डे, प्लंबर जावेद आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नगरसेवक सूर्याजी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT