कोकण

-जिजाऊ संस्थेतर्फे मोफत शिवणकाम प्रशिक्षण

CD

जिजाऊ संस्थेतर्फे मोफत शिवण प्रशिक्षण
वाटद-खंडाळा येथे कार्यक्रम ; २०० महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, खंडाळा केंद्राच्यावतीने आयोजित मोफत शिवणकाम प्रशिक्षणात वाटद पंचक्रोशीतील सुमारे २०० महिला सहभागी झाल्या होत्या. क्रांतिवीर सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला.
वाटद येथे झालेल्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळ पैठणीमध्ये आराध्या पवार व तन्वी ताम्हणकर या मानकरी ठरल्या तसेच इतर खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आले. जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर व तालुकाध्यक्ष मंदार नैकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी उपस्थित महिलांसमवेत त्यांचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला. मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे उद्‍घाटन जिजाऊ संस्था महाराष्ट्र सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर व प्रणाली गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. खंडाळा केंद्रप्रमुख दीपक सांबरे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते केशव बलेकर व नितीन वीर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच महिला कार्यकर्त्या वर्षा निंबाळकर, निधी वीर, दीक्षा जंगम, मंजूषा झगडे व श्रुती जंगम यांनी हळदीकुंकू समारंभाच्या नियोजनापासून सांगतेपर्यंत कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार शिंदे यांनी केले तर छायाचित्रणाची जबाबदारी प्राजक्ता जंगम यांनी पार पाडली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅसचा फटका शिवभोजन थाळीला; एक दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर; दरही वाढले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT