कोकण

बाळासाहेब यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय

CD

बाळासाहेब यांचे शिक्षण
क्षेत्रातील कार्य अतुलनीय
मालवणात श्रध्दांजली ः मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक श्रीपाद ऊर्फ बाळासाहेब पंतवालावलकर यांचे संस्थेच्या प्रगतीत राहिलेले योगदान अतुलनीय होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केले.
सभेच्या सुरुवातीला बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. यावेळी मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी, बाळासाहेबांनी संस्थेसाठी तन-मन-धनाने काम केले. त्यांचे रिक्त स्थान कधीही भरून न येणारे आहे, असे सांगितले. कार्यवाह चंद्रशेखर कुशे यांनी, संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, असे सांगितले. प्रा. सुमेधा नाईक, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, श्रीधर काळे, नितीन वाळके, श्वेता राळकर, सौ. घोगळे, दीपक परब, नागेश कदम यांनीही आपल्या मनोगतातून बाळासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
या श्रद्धांजली सभेला कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शशिकांत झांट्ये व इतर संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बाळासाहेबांनी ज्या निष्ठेने आणि समर्पणाने शिक्षण संस्थेचे काम केले, तोच वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT