कोकण

खेडमधील नव्या पाणीयोजनेची फेब्रुवारीत प्रात्यक्षिक

CD

पाणी योजनेची फेब्रुवारीत प्रात्यक्षिक
खेड नगराध्यक्षांची माहिती; दर्जेदार कामाच्या ठेकेदाराला सूचना
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : खेड शहराला सतावणारी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून नव्या नळपाणी योजनेसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होताच नळपाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी नव्या नळपाणी योजनेवर विशेष लक्ष केंद्रित करत आढावा घेतला. योजनेचे काम उच्चप्रतीचे करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या. फेब्रुवारी महिन्यात नव्या नळपाणी योजनेची चाचणी करण्यात येईल, अशी मागिती नगराध्यक्षा बुटाला यांनी दिली.
शहराला विशेषतः फेब्रुवारी ते मेदरम्यान पाणीटंचाईची झळ बसते. बहुतांश प्रभागांमध्ये कमी दाबाच्या पाणीसमस्येमुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. कित्येक वर्षांपासूनच्या जुन्या नळपाणी योजनेमुळे शहरवासियांसमोर टंचाईचा प्रश्न जटिल बनला होता. ही बाब गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गांभीर्याने घेत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या नव्या नळपाणी योजनेसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेतला. योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगराध्यक्षा बुटाला यांनी कार्यभार स्वीकारताच नव्या नळपाणी योजनेकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर नातूवाडी धरण ते खेड शहर परिसरात राबवण्यात येणाऱ्या नव्या नळपाणी योजनेच्या कामाची सर्व नगरसेवकांसमवेत पाहणी करत आढावा घेतला. नळपाणी योजनेचे काम नेमके कुठपर्यंत आले आहे, याचीही माहिती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT