कोकण

घारपीतील विद्यार्थ्यांनी अनुभवले सामाजिक जीवन

CD

१६३९४

घारपीतील विद्यार्थ्यांनी अनुभवले सामाजिक जीवन
गोव्यात अभ्यास दौरा ः विज्ञान केंद्रासह ऐतिहासिक स्थळांना भेटी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः विद्यार्थ्यांचे ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून समृद्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांचा गोवा राज्यात शैक्षणिक अभ्यासदौरा नुकताच उत्साहात व यशस्वीरीत्या झाला. यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, भूगोल तसेच सामाजिक जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडले.
या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने गोवा विज्ञान केंद्र येथे भेट दिली. विज्ञान केंद्रातील विविध वैज्ञानिक उपकरणे, प्रयोगात्मक प्रतिकृती, गती-ऊर्जा, गुरुत्वाकर्षण, प्रकाश, ध्वनी, विद्युत तसेच मानवी शरीराशी संबंधित माहितीपूर्ण दालनांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील विषय नसून तो दैनंदिन जीवनाशी कसा जोडलेला आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या भेटीतून झाली. तसेच या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी गोव्यातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनस्थळांनाही भेटी दिल्या. पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक वास्तू, चर्च, किल्ले तसेच समुद्रकिनाऱ्यांचे दर्शन घेताना विद्यार्थ्यांना गोव्याचा समृद्ध इतिहास, संस्कृती व नैसर्गिक सौंदर्य अनुभवता आले. या भेटींमुळे इतिहास व भूगोल विषयांतील घटक अधिक सुस्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाली. या अभ्यासदौऱ्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले जितेंद्र कृष्णा गावडे यांनी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
अभ्यास दौऱ्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील व सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, स्वयंपाकी मदतनीस संचिता सावंत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

उद्या 12 मार्चला बनतोय गजकेसरी राजयोग; 5 राशींना होणार फायदा पण 2 राशींचं होणार भयंकर नुकसान !

Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिंग्जवर आजपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’; अतिक्रमण, बेवारस वाहने हटविणार

Mumbai Mhada: मुंबईतील 'या' इमारती म्हाडाच्या होणार, रहिवाशांना भाड्याचा पर्याय; नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT