कोकण

पोलिसवृत्त

CD

लोखंडी वस्तू डोक्यात
पडून कामगार जखमी
कोल्हापूर ः शिरोली एमआयडीसीमध्ये कारखान्यात काम करताना लोखंडी वस्तू डोक्यात पडून कामगार जखमी झाला. आझाद उमेश कुमार (वय २२, रा. शिरोली) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

दुचाकी घसरून
दोघे जण जखमी
कोल्हापूर ः कागलमधील शाहू कारखान्यासमोर दुचाकी घसरून पडल्याने दोघे जखमी झाले. राजू सोमुलू राठोड (वय ४६) व चंद्रकांत कृष्णा राठोड (३५, दोघे रा. कसबा वाळवे, राधानगरी, मूळ रा. कलबुर्गी) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली.


००६९६
रूईतील एकाची
गळफासाने आत्महत्या
रुई ः येथील अभय आण्णा कमलाकर (वय ३८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभय याची पत्नी काही दिवसांपासून मुलगीसोबत माहेरी गेल्या होत्या. शुक्रवार सकाळपासून फोन उचलत नसल्याने मित्रांनी घरी चौकशी केली असता दरवाजा उघडत नव्हता. मित्रांनी घराच्या खिडकीतून बघितले असता अभयने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिस पाटील नितीश तराळ यांनी हातकणंगले पोलिसांत वर्दी दिली. पोलिस उपनिरीक्षक विनोद पिलानी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

विहिरीत बुडून
वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूर ः सांगरूळ (ता. करवीर) येथे हातपाय धूत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने वृद्धेचा बुडून मृत्यू झाला. सावित्री गंगाराम चव्हाण (वय ७२) असे वृद्धेचे नाव आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. सावित्री चव्हाण यांच्या घरातील नातेवाईक शेताकडे गेले होते. त्या नेहमीप्रमाणे दुपारी शेतात शेणी लावण्यास गेल्या होत्या. काम आटोपून विहिरीवर हात-पाय धूत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्या. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

लक्ष्मीपुरीत
मजुरास मारहाण
कोल्हापूर ः लक्ष्मीपुरी पोलिस वसाहत येथे कामानिमित्त राहणाऱ्या ताफोस प्रसेंजीत बर्मन (वय २०, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला मारहाणीचा प्रकार घडला. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याने ही मारहाण केली. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT