कोकण

गवाणकर कॉलेजचे आज स्नेहसंमेलन

CD

गवाणकर कॉलेजचे
आज स्नेहसंमेलन
सावंतवाडी : लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सावंतवाडी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्या (ता. १०) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत संवादचे सावंतवाडी प्रतिनिधी तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभु केळुसकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर असणार असून कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांचीही उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जनरल सेक्रेटरी सर्वेश नाईक व आदिती करंगुटकर यांनी केले आहे.
---------------
सरमळे नांगरतास
येथे आज जत्रोत्सव
आंबोली : सरमळे नांगरतास येथील श्री रामरक्षक देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता.१०) होणार आहे. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री एकला देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा टिकसीनयुक्त ‘व्यंकट रमणा जय गोविंदा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविक व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरमळे नांगरतासवासीयांनी केले आहे.
-----
मालवण येथे
आज बैठक
मालवण : तालुका महिला नाभिक संघटनेची बैठक उद्या (ता.१०) दुपारी ४ वाजता श्री भैरवी देवालय, मालवण येथे आयोजित केली आहे. या बैठकीत हळदीकुंकू समारंभाच्या नियोजनावर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस मालवण तालुक्यातील सर्व महिला विभागप्रमुख, महिला पदाधिकारी तसेच अन्य महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस प्रांतसंघटक विजय चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, विजय शिवा चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला तालुकाध्यक्ष दीपाली शिंदे यांनी केले आहे.
--
नाथपंथी गोसावींची
२४ ला विशेष सभा
कणकवली : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाची विशेष सभा शनिवारी (ता.२४) दुपारी २.३० वाजता कुडाळ येथील श्री सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित केली आहे. या सभेत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. सभेसंदर्भातील लेखी सूचना सभेपूर्वी तीन दिवस आधी मंडळाकडे सादर कराव्यात. सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT