कोकण

मोजणी प्रकरणांचा निपटारासाठी भूमी अभिलेख फौज शेतकऱ्यांच्या बांधावर

CD

मोजणीसाठी भूमी अभिलेख शेतकऱ्यांच्या बांधावर
सचिन इंगळीः १२११ प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११, १७ व १८ जानेवारीला विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यालयात ऑक्टोबर अखेरीस १२११ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी ५१२ प्रकरणे पूर्ण होऊन कार्यालयीन कामावर प्रलंबित असून, उर्वरित प्रकरणांपैकी १०२ मोजणी प्रकरणे वरील नमूद सुट्टीच्या दिवशी कार्यालयातील उपलब्ध भूकरमापकांमार्फत निपटारा करण्यात येणार आहे. ज्यासाठी ५१ भूकरमापक सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी दिली.
या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होणार आहे. या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
यातील १२११ मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झाली असून, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. यापैकी ५१२ प्रकरणांत मोजणी पूर्ण झाली असून, ६०४ प्रकरणांच्या मोजणी तारखा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लावण्यात आल्या आहेत. उर्वरित ९५ मुदतबाह्य मोजणी प्रकरणांना अद्याप मोजणी तारीख मिळण्यावर शिल्लक असून, सदर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

चौकट
पक्षकारांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा
या मोहिमेंतर्गत १०२ मोजणी १०, ११, १७ व १८ जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठवल्या असून, संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, अर्जदार यांनी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख इंगळी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT