कोकण

सावर्डे ः तोंडली-पिलवली विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प

CD

rat9p8.jpg
16529
सावर्डे ः सौरविजेच्या दिव्यांचे विद्यार्थी, पालकांना वाटप करताना डॉ. सचिन शिगवण. शेजारी सुयोग गंगावणे व संदीप सावंत.
-------------
तोंडली-पिलवली विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्प
२ किलोवॅटचा प्रकल्प; ५५ विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ९ ः चिपळूण तालुक्यातील तोंडली-पिलवली येथील आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालयाने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ॲसेंडस फर्स्ट स्पेस कंपनी, ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दी बॉम्बे मिड ईस्ट रोटरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात २ किलोवॅट क्षमतेचा शाश्वत विद्युतीकरण प्रकल्प उभारला आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच झाले. या प्रसंगी विद्यालयातील ५५ गरजू विद्यार्थ्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचे वाटपही केले.
तोंडली येथे झालेल्या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे चेअरमन दीपक सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुयोग गंगावणे उपस्थित होते. या वेळी ‘सोलार मॅन ऑफ इंडिया’ पुरस्कारप्राप्त आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हचे संचालक डॉ. सचिन शिगवण यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी सुयोग गंगावणे आणि डॉ. सचिन शिगवण यांनी सौरऊर्जेचे महत्त्व विशद केले. ग्रामीण भागातील शाळा स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचा प्रकाश मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच मेघ सावंत व रेणुका आगरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करतानाच, ग्रामीण विकासासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्याध्यापक सुखदेव मस्के यांनी प्रास्ताविक केले. संदीप सावंत, विठोबा सावंत, रघुनाथ सावंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT