कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात दोन शाळांत भाषा प्रयोगशाळा

CD

rat9p13.jpg
16569
रत्नागिरी : संस्कृत भाषेतून संस्कृत शिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड. डावीकडून डॉ. दिनकर मराठे, महाबल भट्ट, डॉ. कल्पना आठल्ये व स्मिता सरदेसाई.
-------------
जिल्ह्यात दोन शाळांत भाषा प्रयोगशाळा
नरेंद्र गावंडः संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : प्रत्येक शाळेत श्रवणाच्यादृष्टीने भाषा प्रयोग करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी अशा प्रयोगशाळा होणार आहेत. केवळ विषय शिकवण्यावर भर न देता संस्कृत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेविषयी गोडी कशी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी शब्दात अधिकाधिक आशय असलेल्या रसाळ संस्कृत भाषेत खूप सामर्थ्य आहे. संस्कृतच्या शिक्षकांनी दर महिन्यातून एकदा ऑनलाइन माध्यमातून एकत्र येऊन फक्त संस्कृत भाषेतूनच संवाद साधावा, मी सुद्धा सहभाग घेईन, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले.
संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय, (नवी दिल्ली) यांच्यावतीने गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आजपासून सुरू झाली.
या वेळी मंचावर प्रतिभावंत संस्कृत साहित्यिक महाबल भट्ट आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई आणि उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. प्रमुख अतिथी महाबल भट्ट आणि शिक्षणाधिकारी गावंड यांचा सन्मान करण्यात आला. संस्कृत भाषेतून संस्कृत शिक्षणाचा उद्देश व कार्यशाळेची रूपरेषा संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी दिली.
माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषाकोषाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सुचवले. संस्कृत भाषिक सुबत्ता विद्यार्थ्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेतील पाठ्यांश शिकवताना तो संस्कृत अधिष्ठित व संवादात्मक कसा होईल यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले.

कोट
संस्कृत भाषेचा नित्य सराव अत्यंत आवश्यक आहे. संस्कृत भाषेची शास्त्रीय, व्याकरण आणि शाब्दिकदृष्ट्या असलेली उपयोगिता जाणण्याचा दृष्टिकोन शिक्षकांनी आत्मसात केल्यास अध्यापन प्रक्रिया सुकर होऊ शकते.
- महाबल भट्ट, संस्कृत साहित्यिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT