कोकण

रत्नागिरी -कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई

CD

rat9p26.jpg
16616
कोकण रेल्वे
----------
विनातिकीट प्रवाशांकडून वर्षभरात २० कोटींचा दंड
कोकण रेल्वे प्रशासन ; ३ लाख ६८ हजार प्रवाशांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः कोकण रेल्वेमार्गावर विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. डिसेंबर २०२५ या एकाच महिन्यात रेल्वेने ४३ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे तर संपूर्ण वर्षभरात हा आकडा तब्बल २० कोटींच्या पार गेला आहे.
डिसेंबरमध्ये ९९८ मोहिमा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये एकूण ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये ४३ हजार ८९६ अनधिकृत प्रवासी आढळले. त्यांच्याकडून रेल्वेभाडे आणि दंडस्वरूपात २ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभराच्या कालावधीत कोकण रेल्वेने ८ हजार ४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. वर्षभरात एकूण ३ लाख ६८ हजार ९०१ प्रवाशांवर विनातिकीट किंवा अनियमित प्रवासासाठी कारवाई करण्यात आली. या संपूर्ण वर्षात दंड आणि थकीत भाड्यापोटी रेल्वेच्या तिजोरीत २० कोटी २७ लाख रुपये जमा झाले आहेत. आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वेच्या तिकीट तपासणी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ही मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरील गाड्या आणि स्थानकांवर राबवण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारच्या तीव्र मोहिमा सुरू राहतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चौकट
दंडात्मक कारवाई टाळा
प्रवाशांनी कायदेशीर आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा दंडात्मक कारवाई टाळता येईल, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT