-ratchl९३.jpg
P२६O१६६४२
ः लोटे ः रोटरीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.
------
रोटरी क्लबच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
चिपळूण, ता. १० ः लोटे येथील रोटरी क्लब नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत असते. यावर्षी क्लबने प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित केली. विविध क्षेत्रातील माहितीसह रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिनदर्शिकेतून देण्यात आली.
यासाठी रोटरी, रोट्रॅक्ट व इनरव्हीलच्या पदाधिकाऱ्यांनी तीन महिने मेहनत घेतली. रोटरीचे सचिव आनंद कोळवणकर यांनी इव्हेन्ट चेअरमनचे काम बघत दिनदर्शिकेचे संपूर्ण नियोजन केले. डीटीपी छपाईची जबाबदारी शशांक रेडीज व तुषार दिवेकर यांनी पार पाडली. या दिनदर्शिकेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना रोटरी काम समजेल. यातील सहभागांचे उद्योग, व्यवसाय एकमेकांना समजतील. यातून त्यांच्या व्यवसायांना चालना मिळेल. या सेवेचा लाभ नागरिकांनासहज घेता येईल, असे अध्यक्ष संदीप सुर्वे यांनी सांगितले. या वेळी रोट्रॅक्टचे अध्यक्ष शुभम काते, इनरव्हीलच्या अध्यक्षा प्रणाली रेडीज, माजी असिस्टंट गव्हर्नर पद्माकर सुतार व तिन्ही क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.