-rat९p३२.jpg-
२६O१६६४४
रत्नागिरी : नाचणे येथे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेच्या ब्रह्मानंद ग्राहकपेठेचे उद्घाटन शुक्रवारी करताना डावीकडून अनंत आगाशे, सुनील सहस्रबुद्धे. सोबत ओमप्रकाश गोगटे, विलास कुलकर्णी, आदिती भावे.
---
तरुणांनी उद्योगाकडे वळून रोजगार द्यावा
सुनील सहस्रबुद्धे ः नाचणे येथे ब्रह्मानंद ग्राहकपेठचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : उच्चशिक्षण झाले की, लाखो रुपयांचे पॅकेज मिळाल्याने अनेक युवक-युवती उद्योगाकडे वळत नाहीत. तरुणांनी खरेतर उद्योजक बनून नोकऱ्या दिल्या पाहिजेत. रत्नागिरीत प्रक्रिया उद्योग व अन्य प्रकारच्या उद्योगांमध्ये संधी आहेत. पहिली सात वर्षे उद्योजकाने फायदा बघू नये, असे माझ्या वडिलांनी सांगितले होते; परंतु आता समाजातूनही चांगली मदत मिळत असल्याने युवकांनी व्यवसायाकडे वळावे. निरीक्षण, मार्गदर्शनातून व्यवसायवृद्धी होते, असे प्रतिपादन रुचकर उद्योगसमुहाचे संचालक सुनील सहस्रबुद्धे यांनी केले.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेतर्फे नाचणे येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात आयोजित ब्रह्मानंद ग्राहकपेठेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. या प्रसंगी ब्राह्मणसभेचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्यवाह रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, सदस्य अरुण गानू, आदिती भावे, नीलम जोशी, चंद्रकांत सरदेसाई, देवदत्त पेंडसे उपस्थित होते. हे प्रदर्शन ११ जानेवारीदरम्यान सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये २० स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर सर्व विक्रेत्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी अध्यक्ष अनंत आगाशे म्हणाले, उद्योजकांना व्यासपीठ मिळण्यासाठी, नवीन ओळखी होण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. पदार्थ, वस्तूंना ग्राहक मिळावा, उद्योगाची वाढ व्हावी याकरिता हे प्रदर्शन फायदेशीर आहे. कुवारबाव, खेडशी, मिरजोळे, नाचणे, पोमेंडी येथील हिंदू ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. गोखलेभवनात दुसरे व तिसरे सभागृह बांधण्यात येत आहे. त्याचा उपयोग छोट्या कार्यक्रमांसाठी करता येणार आहे. यातील काही भाग लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांच्या शिकवणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.