कोकण

‘आधार-व्हॉटसॲप’ ज्येष्ठांना मार्गदर्शक

CD

16751

‘आधार-व्हॉटसॲप’ ज्येष्ठांना मार्गदर्शक

मोहन दहिकर ः कुडाळमध्ये ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधार व्हॉट्सॲप’ चॅनेल सदैव कार्यरत असणार आहे. या चॅनेलवरून आवश्यक सूचना ज्येष्ठांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या चॅनेलचा उपयोग करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी येथे केले.
महाराष्ट्र पोलिस दल वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांतर्फे जिल्ह्यातील ‘हाक आमची साथ तुमची’ या टॅगलाईनखाली ज्येष्ठ नागरिक मेळावा व ज्येष्ठांकरिता संवादातून आधार-व्हॉटसॲप चॅनल लोकार्पण सोहळा येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हा विधी सेवा व प्राधिकरण सचिव संपूर्णा मुंडेवाडी, ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाध्यक्ष राजस रेगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सकपाळ, सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सिंधुदुर्ग पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली. आधार-व्हॉटसॲप चॅनेलचे लोकार्पण श्री. गंगावणे यांच्या हस्ते झाले. माड्याचीवाडी-रायवाडी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट  (पिंगुळी) संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे, संविता आश्रम (पणदूर) संस्थापक संदीप परब, सीताराम संजीवनी आनंदाश्रम (निवती) च्या सानिका तुळसकर, आनंदाश्रम (अणाव) चे बबन परब, दिविजा आश्रमाचे (असलदे) संकेत शेटये यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्णा मुंडेवाडी यांनी ज्येष्ठ नागरिक समस्या व कायदेविषयक मार्गदर्शन केले. प्रवीण कोल्हे यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची माहिती दिली. नलिनी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अमर प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेच्या अभियंत्यांना दिलासा! मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी अटक केली जाणार नाही

BMC Election: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही! भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय संताप

Malegaon Municipal Election : बोटावरची शाई आता इतिहासजमा! मालेगाव महापालिका निवडणुकीत वापरले जाणार १५०० मार्कर पेन

बाबो! पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’, कार पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी, viral video

Latest Marathi News Live Update : सटाण्यातून SBIचं एटीएम चोरीला

SCROLL FOR NEXT