कोकण

राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे यश

CD

16757

राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये
खारेपाटण हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन २०२६ ही स्पर्धा जत (जि. सांगली) येथे झाली. यामध्ये काता व कुमिते या दोन क्रीडा प्रकारांत खारेपाटण हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
विविध क्रीडा प्रकारांत यश मिळविलेले विद्यार्थी असे - हर्ष तावडे (आठवी)- फाईट (रौप्य), काता (सुवर्ण), निधी शिवलकर (सहावी)-फाईट व काता (रौप्य), मनस्वी सकपाळ (पाचवी)- फाईट (रौप्य), आर्यन कोवळे (सहावी)- फाईट व काता (कांस्य), मनस्वी राऊत (पाचवी)-फाईट व काता (ब्राँझ), त्रिशा साळुंखे (पाचवी)- फाईट व काता (ब्राँझ), सुखदा राऊत (पाचवी)-फाईट (ब्राँझ), दृष्टी चव्हाण (सहावी)-फाईट (ब्राँझ). या विद्यार्थ्यांना कराटेपटू युवराज राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! रात्री जेवणातून पालकांना झोपेच्या गोळ्या द्यायची; नंतर प्रियकरासोबत... आठवीतील मुलीचं भलतंच कांड, पण डाव कुठे फसला?

इंडियन आयडल विजेत्या गायकाचं निधन, वयाच्या ४५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nylon Manja Ban : येवला-सिन्नरमध्ये पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड! ११८ नायलॉन मांजाचे रीळ जप्त, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

SCROLL FOR NEXT