कोकण

मालवणात प्रशासकीय कार्यकाळात भ्रष्टाचार

CD

16789
मालवणात प्रशासकीय कार्यकाळात भ्रष्टाचार

ठाकरे शिवसेनेचा आरोप; कचरा व्यवस्थापनासह विकासकामांबाबत आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : येथील नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी केला आहे. नगरसेवक नसले की प्रशासन मनमानी कारभार करते, हेच यातून सिद्ध होत असून, आम्ही जनतेच्या पैशांचा हा अपहार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ठाकरे शिवसेना कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, ॲड. सुमित जाधव, तेजस नेवगी, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
शहरात कचरा विलगीकरण आणि खत निर्मितीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या. मात्र, प्रत्यक्षात खत निर्मिती शून्य आहे. याबाबत श्री. म्हाडगुत यांनी सांगितले, की आम्ही प्रत्यक्ष डम्पिंग यार्डची पाहणी केली असता तिथे यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळली. कागदावर १६ कामगार दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात केवळ ५-६ कामगार कार्यरत होते. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कामगारांची हजेरी पालिकेत लावली जाते, तेच कामगार शहरातील खासगी मॉल्स आणि दुकानांमध्ये कामाला आहेत. कामगारांच्या नावावर पैसे उचलून ते पुन्हा त्यांच्याकडून काढून घेतले जात असल्याचा संशय आहे.
२०२२-२३ या सहा महिन्यांत १४ लाख ५८ हजार खर्च दाखविला, तर खत निर्मिती शून्य. २०२४ या वर्षात ५७ लाख ५६ हजारांचे टेंडर काढण्यात आले. त्यातील ३५ लाख अदा केले तर खत निर्मिती शून्य. एवढा मोठा खर्च होऊनही कचऱ्याचे ढीग तसेच असून ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का दिली जाते, असा प्रश्न ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. नगरसेवक कशाला हवेत? असे विचारणाऱ्यांना हे उत्तर आहे. प्रशासकीय काळात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी नगरसेवकच हवेत. आम्ही सध्या विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर अंकुश ठेवून मालवणच्या जनतेला दर्जेदार सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करू. दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही, असा इशाराही दिला.
---
दीड लाखाची निविदा का?
आडवण दलित वस्तीतील पाणीपुरवठा आणि पंप बसवण्याच्या कामातही मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ज्या कामासाठी १ लाख ४७ हजारांची निविदा काढली, ते काम प्रत्यक्षात ४० ते ५० हजारांचे आहे. वायरचे अंदाजपत्रक बघितले तर ते अवास्तव होते. आम्ही पाहणी केली तेव्हा पंप आणि पॅनल आधीच बसवलेले होते आणि पाणीपुरवठा सुरू होता. जर काम आधीच झाले होते, तर निविदा कोणासाठी काढली? हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेला भ्रष्टाचाराचा कळस आहे, असे म्हाडगुत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेच्या अभियंत्यांना दिलासा! मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी अटक केली जाणार नाही

BMC Election: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही! भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय संताप

Malegaon Municipal Election : बोटावरची शाई आता इतिहासजमा! मालेगाव महापालिका निवडणुकीत वापरले जाणार १५०० मार्कर पेन

बाबो! पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’, कार पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी, viral video

Latest Marathi News Live Update : सटाण्यातून SBIचं एटीएम चोरीला

SCROLL FOR NEXT