कोकण

यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

CD

16777
यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

नीतेश राणे : आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा नियोजन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले.
आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ८ फेब्रुवारी, तर कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा जत्रोत्सव महाशिवरात्री दिनी १५ फेब्रुवारीला होणार आहे. या दोन्ही जत्रोत्सवांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘हे दोन्ही जत्रोत्सव जिल्ह्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कर्मचारी नेमावेत. यात्राकाळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवाव्यात. भाविकांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त वैद्यकीय पथके, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त डॉक्टर व बेडची व्यवस्था करण्यात यावी.’ ते पुढे म्हणाले, ‘स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घ्यावी. यात्रेच्या कालावधीत तसेच यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य आणि वेळेत विल्हेवाट लावावी. पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पुरेशा प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. महावितरणने वीजपुरवठ्याबाबत अधिक दक्षता घ्यावी.’
..................
मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवा
मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून सुरक्षिततेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल. एका ठिकाणी अतिगर्दी होऊ नये, म्हणून दुकानांना ठराविक अंतर राखून परवानगी द्यावी. भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नियोजन, शिस्त आणि सेवाभावाच्या माध्यमातून हे जत्रोत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पडावेत, असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT