कोकण

जिल्हा परिषदेतील रखडलेले प्रश्न सुटले

CD

16782

जिल्हा परिषदेतील रखडलेले प्रश्न सुटले

पालकमंत्री नीतेश राणे ः सिंधुदुर्गनगरी येथे वैयक्तिक लाभ वितरण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना अपेक्षित असलेले काम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक वर्षे न सुटलेले प्रश्न सोडविले आहेत. जनता नेहमी सरकारला ‘माय-बाप सरकार’ असे संबोधत असते, ते माय-बाप सरकार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृतीतून दाखविले आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व वैयक्तिक लाभ वितरण कार्यक्रमात काढले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मानाचा महासोहळा आज सिंधुदुर्गनगरी येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिंदे शिवसेनेचे संजय पडते उपस्थित होते. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग सर्वच बाबतीत आदर्श ठरत आहे. राज्यात अग्रेसर होत आहे. या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात उत्तम संवाद आहे. त्यामुळे आमचा जिल्हा राज्यासह अन्य राज्यांच्या तुलनेतही पुढे आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या खर्चातसुद्धा जिल्हा पुढे आहे. माझ्यासह खासदार राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे या महायुतीतील लोकप्रतिनिधींची विकास करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आणि त्याला प्रशासनाची मिळालेली साथ यामुळे हा बदल दिसत आहे. पालकमंत्री म्हणून मी प्रशासनासोबत आहे. कोणतीही कठीण समस्या घेऊन या. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवू.’
यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना चाव्या वितरण, आयुष्मान भारत कार्ड वितरण, बचतगट वाहन वितरण, लाड पांगे नियुक्ती पत्र, पदोन्नती कर्मचाऱ्यांना आदेश, शेतकरी उत्यादक कंपन्यांना धनादेश, स्वच्छ भारत अभियान, जिल्हा परिषद २० टक्के शेष फंडातून मागासवर्गीय शिलाई मशीन, जुने घर दुरुस्ती, ५ टक्के अंध व्यक्तींना मोबाईल खरेदीसाठी अर्थसाहाय्य, कृषी हळद युनिट साहित्य, पशुसंवर्धन शेष फंड लाभार्थी वितरण अशा अनेक योजनांचे वितरण करण्यात आले. तसेच पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आणि मंजूर कामांचे भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने केले. अमित तेंडुलकर यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी आभार मानले.
........................
विकासकामांना वेग
प्रास्ताविक करताना खेबुडकर यांनी, आज आपण २९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करीत आहोत. गेल्या वर्षभरात १५६ जणांना शासकीय नोकऱ्या दिल्या आहेत. उमेद अंतर्गत बचतगटांना १०५ कोटी रुपये दिले आहेत. वर्षभरात जिल्हा परिषद ६०० कोटींची कामे करते. जल जीवन मिशन योजनेचा खर्च ४६ टक्के झाला आहे. लखपती दीदीअंतर्गत ११४ टक्के काम झाले आहे. हळद प्रक्रियेला बचत गटाच्या माध्यमातून प्राधान्य देत आहोत. सौरऊर्जा वापराला महत्त्व देत आहोत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

'काका, पास घरी राहिलाय; बाबांना फोन करा ते पैसे देतील'! पाचवीतील मुलाची विनंती, तरीही बस कंडक्टर महामार्गावर उतरवलं, नंतर...

BMC Election: निवडणूक प्रक्रियेवर १०५ ड्रोनद्वारे नजर, संवेदनशील प्रभागांवर २४ तास लक्ष

IND vs NZ, Video: हर्षित राणाच्या 'गेम चेंजर' विकेट्स! भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांना पाहा कसं केलं आऊट

Bigg Boss Marathi 6 Live Update: किती दिवस असणार 'बिग बॉस मराठी ६' चा हा सिझन? सतीश राजवाडे म्हणाले-

SCROLL FOR NEXT