कोकण

सावंतवाडी रुग्णालयात २० ला आरोग्य शिबिर

CD

सावंतवाडी रुग्णालयात
२० ला आरोग्य शिबिर
सावंतवाडी ः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयात २० जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्‍घाटन सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शिबिरासाठी भ. क. ल. वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार (अँजिओप्लास्टी, बायपास), युरोलॉजी (मूत्रपिंड व प्रोस्टेट विकार), अस्थिरोग (अपघात व सांधेदुखी), कॅन्सर शस्त्रक्रिया, डोळ्यांचे विकार (मोतिबिंदू व कॉर्निया), स्त्रीरोग, कान-नाक-घसा तसेच जनरल सर्जरी अशा विविध विभागांतील आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली जाणार आहे. लाभार्थींनी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड तसेच आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी केले आहे. तुळस (ता. वेंगुर्ले) येथेही २१ जानेवारीला वेताळ प्रतिष्ठान तुळस व कोकण संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT