कोकण

मिरजोळीच्या सरपंचपदी विनोद पवार बिनविरोध

CD

-ratchl१०५.jpg -
२६O१६७९४
चिपळूण ः सरपंच विनोद पवार यांना निवडीचे पत्र देताना निवासी नायब तहसीलदार मोरे
----
मिरजोळी सरपंचपदी विनोद पवार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः तालुक्यातील मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांचे निधन झाल्याने या पदासाठीची पोटनिवडणूक शुक्रवारी (ता.९) घेण्यात आली. त्यामध्ये माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विनोद पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपदाचा कालावधी संपायला अवघा दीड महिना बाकी असताना सरपंच कासम दलवाई यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली. मिरजोळीत सरपंचपदाची पोटनिवडणूक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार मिरजोळी ग्रामपंचायतीत शुक्रवारी (ता. ९) दुपारी विशेष सभा घेण्यात आली. या सभेतच सरपंचपदाची निवड करण्यात आली. सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. निवडीवेळी विनोद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक महसूल नायब तहसीलदार वाल्मीकी मोरे यांच्या उपस्थित पार पडली. ग्रामविकास अधिकारी रोहिदास हांगे यांनी पवार यांना सरपंच म्हणून जाहीर केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य माधुरी सकपाळ, वृषाली कदम, संदीप जाधव, कर्मचारी जितेंद्र पवार, नीरज मोहिते, करिष्मा पवार, श्रद्धा पवार, सृष्टी पवार, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT