-ratchl१०१.jpg ः
KOP26O16804
रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना हिंदूराष्ट्र समन्वय समितीचे पदाधिकारी.
---
अवैध भंगार व्यवसायांवर कारवाई करा
हिंदू राष्ट्र समन्वय समिती; चिपळूण पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण शहरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायांकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या व्यवसायांची कोणतीही नोंद किंवा परवानगी पालिकेकडे नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
समितीने यापूर्वी चिपळूण पालिकेला निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या; मात्र, आजतागायत एकाही व्यावसायिकाने या नोटिशीला उत्तर दिलेले नाही, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. पालिका प्रशासनाला आणि नियमांना न जुमानता हे व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहेत. यामुळे पालिकेचा महसूल तर बुडतच आहे; पण या प्रकरणामागे नेमके कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. आर्थिक देवाणघेवाणीचा संशय शहरात एकीकडे स्वच्छतामोहीम राबवली जाते तर दुसरीकडे लोकवस्ती, बाजारपेठ आणि महामार्गावर भंगाराचे ढीग साचलेले आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेने एका भंगार व्यावसायिकाला साहित्य दिले होते, ज्यावरून मोठे आंदोलन झाले होते; मात्र, तो विषय नंतर दडपण्यात आला. अशा घटनांमुळे पालिका प्रशासन आणि अवैध व्यावसायिक यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. हे निवेदन देताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे अनुराग उतेकर, हेमंत चाळके, विक्रम जोशी, प्रशांत उतेकर, अमित जोशी, संजय जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
------
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन
पिंपळीखुर्द येथील रहिवासी जगदीश इंदुलकर यांनी या अवैध व्यवसायांबाबत स्थानिक प्रशासनाने दाखवलेली उदासीनता कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन समितीला दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.