कोकण

एस.टी. स्टॅण्डजवळ बेकायदेशीर माती उत्खनन

CD

संगमेशव्र एसटी स्टॅण्डजवळ माती उत्खनन
मनोज साठ्ये ः नावडी परिसरात घरांसह प्रवाशांना धोका
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः नावडी परिसरात मुंबई–गोवा महामार्गालगत आणि संगमेश्वर एसटी स्टॅण्डच्या शेजारीच प्रचंड प्रमाणात अनधिकृत माती उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ५० ब्रासची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक ब्रास माती उत्खनन केले जात असल्याचा गंभीर आरोप मनोज साठ्ये यांनी केला आहे.
या माती उत्खननामुळे ३ ते ४ घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही घरे कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. बाजूलाच एसटी स्टँड असल्यामुळे इथे उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत मनोज साठ्ये यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग, संगमेश्वर तहसीलदार, माभाळे मंडळ अधिकारी, संगमेश्वर पोलिस यांना निवेदन दिले आहे. तातडीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्टँडजवळ होत असलेल्या माती उत्खननामुळे परिसरातील रहिवासी घरे तसेच दररोज हजारो प्रवासी वापरत असलेला एसटी स्टॅण्डही धोक्यात आला आहे. नावडी येथील हा भाग टेकडीसारखी उंच असून, संगमेश्वर (नावडी) एसटी स्टॅण्ड व मुंबई–गोवा महामार्गालगत आहे. या ठिकाणी केवळ ५० ब्रास माती उत्खननाची परवानगी घेतली असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ब्रास मातीचे उत्खनन केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणाची खनिकर्म विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी, उत्खनन तत्काळ थांबवावे तसेच कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT