कोकण

‘जनसेवा निधी’तर्फे पुरस्कार वितरण

CD

16924
बांदा ः येथे जनसेवा जनसेवा निधी पुरस्कार प्राप्त मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांसह अच्युत सावंत भोसले, डॉ. मिलिंद खानोलकर.


‘जनसेवा निधी’तर्फे पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः येथील जनसेवा निधी या संस्थेचा ३७ वा आदर्श पुरस्कार वितरण सोहळा पीएमश्री केंद्र शाळा बांदाच्या सभागृहात उत्साहात झाला. या सोहळ्यास श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी-भोसले नॉलेज सीटी सावंतवाडीचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार सीमा पंडित (श्री देवी माऊली विद्यामंदिर सातोसे नं.१, ता. सावंतवाडी), आदर्श माध्यमिक शिक्षक महादेव पवार (प्रगत विद्यामंदिर रामगड, ता. मालवण), आदर्श समाजसेवक नारायण चेंदवणकर (रा. बांबुळी, ता. कुडाळ), तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार शरद चोडणकर (करंजे-नागवे-साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे, ता. कणकवली) यांना प्राप्त झाला. तसेच एस. एस. सी. (१० वी) परीक्षा मार्च २०२५ बांदा केंद्र इंग्रजीमध्ये प्रथम पूजा सावंत, मराठी विषयात प्रथम श्रीशा सावंत व पूजा सावंत, विज्ञान विषयात प्रथम कृपा वारंग,गणित विषयात प्रथम स्वरा हरमलकर, एच. एस. सी. (१२ वी) मार्च २०२५ बांदा केंद्रात प्रथम सिद्धी वराडकर या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड सत्कारासाठी केली होती.
शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल श्री. सावंत भोसले यांचा अध्यक्ष डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर, अपर्णा खानोलकर, डॉ. आश्विनी खानोलकर, हेमंत खानोलकर, बांदा नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, गुरुनाथ नार्वेकर, सुधीर शिरसाट, भरत गावडे, कमलाकर धुरी, अरुण देसाई, शंकर नार्वेकर, दत्ताराम साडेकर, बंड्या नार्वेकर, सुनील नाटेकर उपस्थित होते. गुरुनाथ नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. गौरवी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. भरत गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT