कोकण

सावंतवाडीत खाकीतील माणुसकीचा उत्सव

CD

16919

सावंतवाडीत खाकीतील माणुसकीचा उत्सव

पोलिस दल स्थापना दिन; ‘खेळ पैठणीचा’, रक्तदान शिबिर थाटात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलिस ठाण्याच्यावतीने विविध सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलिस, त्यांचे कुटुंबीय व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाचा आनंद लुटला. यामध्ये महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर विशेष आकर्षण ठरले.
मंगळवारी (ता. ६) सायंकाळी ६ ते ९ या वेळेत महिला पोलिस अंमलदार, पोलिस कुटुंबीय आणि शहरातील इतर महिला बचतगटांसाठी ‘खेळ पैठणीचा’ उपक्रम झाला. दिवसभराच्या तणावातून विरंगुळा मिळावा आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राबवलेल्या या कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. बुधवारी (ता. ७) सावंतवाडी पोलिस ठाणे, रोटरी क्लब, रक्तदाता संघटना आणि ‘ऑन कॉल ब्लड ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. शिबिरात पोलिस अधिकारी, अंमलदार आणि नागरिक अशा एकूण ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्‍घाटन सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी पोलिस दलाच्या सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ​या कार्यक्रमास निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, नगरसेवक देव्या सूर्याजी, ॲड. भांबुरे तसेच कुडाळ, वेंगुर्ले, निवती, दोडामार्ग, बांदा आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. ​सावंतवाडी पोलिसांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT