कोकण

मल्लखांब-धनुर्विद्येतून दिसली ग्रामीण विद्यार्थ्यांची ताकद

CD

16978

मल्लखांब-धनुर्विद्येतून दिसली ग्रामीण विद्यार्थ्यांची ताकद

ओसरगाव नं. १ शाळा; पारंपरिक खेळांनी जिंकली उपस्थितांची मने

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ : ओसरगाव नं. १ (ता.कणकवली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजे प्रतिष्ठान सिंधू आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब, धनुर्विद्या व लाठीकाठी या पारंपरिक खेळांची कार्यशाळा उत्साहात झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेने उपस्थितांचे मनं जिंकले.
कार्यशाळेचे उद्‍घाटन सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष विलास परब, माजी सरपंच बबली राणे, जीवबा अपराज, नयन आलव, किशोर तांबे, सीआयएसएफ निवृत्त अधिकारी बाळकृष्ण कावले, राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब तसेच शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम उपस्थित होते.
प्रशालेत शैक्षणिक अध्यापनासह क्रीडा, संस्कार आणि व्यक्‍तिमत्व विकास उपक्रम राबविणारे मुख्याध्यापक किशोर कदम यांचा सत्‍कार करण्यात आला. ‘राजे प्रतिष्ठान सिंधू ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवित असून, पारंपरिक खेळांचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे, असे गौरवोद्गार ॲड. विलास परब, किशोर कदम आणि ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास राणे यांनी काढले.
कार्यशाळेत इंडियन आर्चरी आणि रिकव्हरी आर्चरीचे प्रात्यक्षिक निहार चव्हाण, रंजना चव्हाण आणि सृष्टी चव्हाण यांनी सादर केले. लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दुर्वा चव्हाण, वेद चव्हाण, निहार चव्हाण, रंजना चव्हाण, सृष्टी चव्हाण आणि सोहम चव्हाण यांनी दाखवले. रोप मल्लखांबमध्ये विविध योगासने तर पोल मल्लखांबमध्ये बजरंगी, बगली कात्री आणि टीम पिरॅमिडचे आकर्षक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विश्वास परब, जगन्नाथ मोडक, गौरेध शिरोडकर, देवानंद राणे, विवेक परब, उमेश परब, सचीन परब, आशिष मोडक, संतोष मोडक, केशव मोडक, मनोज पारकर, योगेश्वर मोडक, वैभव मोडक, विनय परब, केशव, रुपल परब, प्रिया परब, दर्शना शिरोडकर, दिपश्री राणे, प्रदिप मेस्त्री, गौरव मोडक, चेतन मोडक, विनय मोडक, उदय मोडक, यश परब, सुनील सावंत, गीतेश लाड, मयुरेश मोडक, प्राजक्ता परब, प्रणिता मोडक, प्रीती मोडक आणि अपर्णा मोडक यांनी विशेष मेहनत घेतली. प्रमिता तांबे यांनी सूत्रसंचालन केले. विवेक परब यांनी प्रास्ताविक केले. शीतल दळवी आणि राजश्री तांबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT