कोकण

व्यापारी मंडळींच्या त्यागातून उभारली पैसाफंड संस्था

CD

-rat११p२७.jpg-
२६O१६९६९
संगमेश्वर ः खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे स्वागत करताना व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये. सोबत डावीकडून सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, धनंजय शेट्ये, उत्तम कुमार जैन, अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, विनोद म्हस्के, करण खेडेकर, नंदू साळवी आदी.
-----

पैसाफंडच्या जडणघडणीत व्यापाऱ्यांचा त्याग
वैभव खेडेकर ःशाळेसाठी मैदान उपलब्ध करून देणार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः गेली ९७ वर्ष अनेक अडचणींवर मात करत संस्था टिकवायचे काम सोपे नाही. पारतंत्र्यात संगमेश्वर येथील व्यापारी मंडळींनी गोरगरीब आणि होतकरू मुलांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. त्या विचारांचा आज वटवृक्ष झाला आहे. पैसा फंड संस्थेची शैक्षणिक वाटचाल अभिमानास्पद आहे. या संस्थेच्या शाळेला भव्य मैदान तयार करून देण्यासाठी प्रयत्न करु, असे खेडचे माजी नगराध्यक्ष व राज वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.
पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, स्नेह ज्योती विद्यालयचे उत्तम कुमार जैन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, करण खेडेकर, राजवैभव पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले, दिनेश अंब्रे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT