कोकण

अभियानांसाठी मनोरंजनाचा आधार हे प्रशासनाचे अपयश

CD

O17025

अभियानासाठी मनोरंजनाचा
आधार हे प्रशासनाचे अपयश

गुरुदास गवंडे ः यंत्रणेचा ‘खेळखंडोबा’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ यशस्वी करण्यासाठी सेलिब्रिटींना आणावे लागते, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अपयश आहे, असा आरोप सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडेचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी योग्य प्रशिक्षण देऊन लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे अपेक्षित असताना मनोरंजनाचा आधार घ्यावा लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
श्री. ​गवंडे यांनी सावंतवाडी पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की ‘तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत. मात्र, केवळ ४७ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. जूनपासून गटविकास अधिकारी (बीडीओ) हे पद रिक्त आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी लाच घेताना पकडले जात आहेत. लेखापरीक्षण अहवालासाठी २० ते ३० हजार रुपये मागितले जातात, तर बदलीसाठी अधिकारी लाखो रुपये मोजत आहेत.’
​यावेळी त्यांनी वाळू प्रश्नावरूनही प्रशासनाला धारेवर धरले. घरकुल योजनेसाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय झाला असला, तरी तहसीलदार कार्यालयात अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. मंत्री आणि अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. प्रशासकीय यंत्रणेचा सध्या ‘खेळखंडोबा’ सुरू असून, अशाच प्रकारे सेलिब्रिटी आणून मोहिमा राबवायच्या असतील, तर गौतमी पाटील यांनाच प्रत्येक ग्रामपंचायतीचे ब्रँड अँबेसिडर करा, असा उपरोधिक टोलाही गवंडे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची मिश्र सुरुवात! युद्ध समाप्तीच्या संकेतांनी बाजाराला दिलासा; मात्र या सेक्टरवर दबाव वाढला

India Bangladesh Diesel Supply : युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट, तरीही भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल; नेमकं कारण काय ?

Latest Marathi News Live Update : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांची कुपर रुग्णालयाला भेट

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

SCROLL FOR NEXT