Rat१२p१९.jpg -
२६O१७१३८
मंडणगड: अजातशत्रू नाटकाचा नाट्यप्रयोग सादर करताना कलाकार.
-----
मंडणगडच्या नाट्यचळवळीला नवे बळ
‘अजातशत्रू’ ऐतिहासिक नाटकाला, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ः मंडणगड तालुक्यात काही काळ खंडित झालेल्या नाट्यचळवळीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या अजातशत्रू या दोनअंकी ऐतिहासिक नाटकाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात ९ जानेवारीला हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडावर आधारित असलेल्या या नाटकाचे लेखन बाळासाहेब थोरात यांनी केले असून, तालुक्यातील दहागाव येथील युवा नाट्यकर्मी योगेश दळवी यांच्या पुढाकारातून मैत्रय संघ या निर्मिती संस्थेने हा प्रयोग तालुक्यातील रसिकांसमोर आणला. मंचावर सुमारे ३० कलाकारांनी प्रभावी सादरीकरण केले. हे नाटक मगध वंशातील राजा अजातशत्रू यांच्या जीवनावर आधारित आहे. बिंबीसार यांचा पुत्र असलेला अजातशत्रू हा भगवान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन राजा होता. सत्तास्थापनेसाठी त्याने वडिलांकडून मगधचे राज्य ताब्यात घेतल्याची तसेच लिच्छवींच्या वज्जी संघाविरुद्ध युद्ध करून वैशाली जिंकल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी नाटकात प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे भरलेल्या पहिल्या बौद्ध परिषदेकरिता राजा अजातशत्रूने दिलेल्या राजाश्रयाचाही उल्लेख नाटकात येतो. सत्तास्थापनेनंतर अजातशत्रूच्या व्यक्तिमत्त्वात शांततेच्या मार्गाने झालेले परिवर्तन आणि त्यानंतर धम्मासाठी केलेल्या कार्यावर नाटकाने विशेष प्रकाश टाकला. अनेक वर्षांनंतर तालुक्यात सादर झालेल्या या उच्चदर्जाच्या वैचारिक नाट्यप्रयोगाच्या यशस्वितेसाठी माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, दिलीप मराठे, मनोज मर्चंडे आणि अनंत नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.