कोकण

रत्नागिरी रंगला ''अतुल्य भारत''चा आविष्कार

CD

-rat९p२५.jpg-
२६O१६६१५
रत्नागिरी ः विसपुते स्कूलमधील सांस्कृतिक महोत्सवात नृत्य सादर करताना विद्यार्थिनी.
--------
रत्नागिरीत ‘अतुल्य भारत’चा आविष्कार
विसपुते इंग्लिश स्कूल ; नृत्यातून राज्यांचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः कुवारबाव येथील मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा (कुवारबाव) वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘अतुल्य भारत’ कार्यक्रम उत्साहात झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात येथे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. यावर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची संपूर्ण आखणी ‘अतुल्य भारत’ या संकल्पनेवर आधारित होती. विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार नृत्याविष्कारांतून भारतातील विविध राज्यांचे दर्शन घडवले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची सांस्कृतिक विविधता, लोकनृत्ये आणि प्रादेशिक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी रंगमंचावर जिवंत केली.
विद्यार्थ्यांच्या तालावर मान्यवरांनीही धरला ठेका कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बालगोपाळांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण. विद्यार्थ्यांच्या नृत्यातील उत्साह पाहून उपस्थित मान्यवरही स्वतःला रोखू शकले नाहीत. संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, राजेंद्र कारंजकर आणि नरेंद्र गावंड यांनी रंगमंचावर जाऊन विद्यार्थ्यांसोबत नृत्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाला ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रवीण मलुष्टे, जयंत जोशी, उमेश राऊत, अनिल काटे, स्नेहल वैशंपायन, ज्योती गावंड आणि ईशा पेडणेकर यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT