कोकण

म्युझिक, मस्तीमध्ये रमले माजी विद्यार्थी

CD

17235

म्युझिक, मस्तीमध्ये रमले माजी विद्यार्थी

बांद्यातील स्नेहमेळावा; देवगड अध्यापक महाविद्यालयाचे सवंगडी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) अभ्यासक्रमाच्या निमित्ताने देवगड येथील शां. कृ. पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयात एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींचा सहावा स्नेहमेळावा म्युझिक, मस्ती, गप्पा आणि गीतांच्या (एम२ जी२) माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सगळेजण अध्यापक महाविद्यालयात शिकत असलेल्या वयात पोहोचले होते. वय म्हणजे केवळ आकडे असतात, जगण्यातील आनंद शोधायचे असेल, तर लहान व्हा, असाच जणू संदेश सर्वजण देत होते. ‘एम२ जी२’ हेच आनंदी जगण्यासाठीचे ‘टॉनिक’ आहे, हेच या गेट टुगेदरने दाखवून दिले.
बांदा सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामी मठात स्नेहमेळावा झाला. यावेळी सदाशिव गवस, तारका सावंत, गीता सावंत, प्रभाकर धुरी, बाळू खानोलकर, शैलैंद्र आमणगी, विजय देवदास, जनार्दन मराठे, प्रमिला डायस, राजेंद्र पाटील, विजय गावकर, चारुता काळे, अनिल लोके, दादा रेडकर, अवधूत येनजी, संजय जोशी, संजय देसाई, सुजाता धानजी, संतोष वायंगणकर, संध्या वायंगणकर, दशरथ घाडी, जगदीश धोंड, धनंजय आंबेरकर, सुषमा जुवेकर, एन. डी. पाटील, एस. के. देसाई, दिलीप काळे, आनंदा जाधव, भास्कर जडये, प्रभा गवंडे, राजन कर्पे, राजदा कुबल, अंकुश तावडे, प्रकाश घाडी, अभय मुणगेकर, दिनेश आजगावकर, अलका वाळवेकर, गीता जुवेकर, सरोज तोरसकर, गुरू कुसगावकर, नाना मांजरेकर, विलास देऊलकर, वीणा पटवर्धन, आर. एच. सावंत, चंद्रशेखर सातार्डेकर, लक्ष्मण आंबेरकर आदी उपस्थित होते.
मठाचे प्रमुख मानकरी बाबी वसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर शैलैंद्र आमणगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. वीणा पटवर्धन, चारुता काळे, प्रभाकर धुरी यांनी कविता वाचन केले. दशरथ घाडी, संजय जोशी, प्रभाकर धुरी, अलका वाळवेकर, सुषमा जुवेकर, संध्या वायंगणकर, गुरू कुसगावकर, राजेंद्र पाटील, दत्तप्रसाद खानोलकर, चारुता काळे यांनी वेगवेगळी गीते सादर केली. जनार्दन मराठे यांनी बासरी वादन केले. बासरीवर वाजवलेला ‘मीच खरा अपराधी’ हा अभंग लक्षवेधी ठरला. हिंदी, मराठी गाणी आणि अभंगाच्या स्वरांनी परिसर नादमय झाला होता. सायंकाळी केक कापून सहाव्या स्नेहमेळाव्याचा समारोप झाला. स्नेहमेळाव्याचे आयोजन ग्रुप लीडर सदाशिव गवस, दशरथ घाडी, भारत गावडे, जगदीश धोंड, संजय देसाई, शंकर देसाई, प्रभाकर धुरी यांनी केले. प्रभाकर धुरी यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ घाडी यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव गवस यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT