कोकण

सावंतवाडीत ‘वीर जवान दौड’ला प्रतिसाद

CD

17238

सावंतवाडीत ‘वीर जवान दौड’ला प्रतिसाद

मॅरेथॉन स्पर्धा; जिल्ह्यातील चारशेहून अधिक सहभागी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः सैनिक स्कूल आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील वीर जवानांना समर्पित करण्यात आली होती. या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
​मोती तलावाच्या काठावरील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे स्पर्धेचे उद्‍घाटन व बक्षीस वितरण झाले. मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेची सुरुवात झाली. राष्ट्रगीतानंतर सैनिक स्कूलचा सिनियर कॅडेट अथर्व पालव याने स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तर क्रीडा शिक्षक मनोज देसाई यांनी नियमावलीचे वाचन केले. ही स्पर्धा १०, १४, १७ वयोगटातील मुले-मुली व खुला गट अशा एकूण सात प्रकारात घेण्यात आली. ​स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा ः ​१० वर्षांखालील मुले: स्वराज सावंत, सर्वेश कापडी, निर्मय रेडकर. १० वर्षांखालील मुली: हिंदवी दळवी, स्पृहा नार्वेकर, काव्या राऊळ. १४ वर्षांखालील मुले: वेदांत पाटील, भावेश यादव, वेदांत भोपळे. १४ वर्षांखालील मुली: अनन्या कुंभार, आस्था लिंगवत, श्रावणी महाडेश्वर. १७ वर्षांखालील मुले: जयेद शेख, सुनील जंगले, यश कडव. महिला खुला गट: मेघा सातपुते, रेश्मा पांढरे, तेजस्वी गावडे. पुरुष खुला गट: ओमकार बैकर, आदित्य राऊळ, ओम उन्हाळकर.
​बक्षीस वितरण सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, कर्नल विजयकुमार सावंत आदींच्या हस्ते झाले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डोन्टस, बाबुराव कविटकर, दिपक राऊळ, नगरसेविका दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, डॉ. स्नेहल गोवेकर, प्राचार्य नितीन गावडे उपस्थित होते. एस.के. गावडे व शैलेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. सुनिता म्हाडगूत व भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजचा विशेष सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT