-rat११p२५.jpg-
२६O१६९६७
रत्नागिरी : सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उद्योजक गौरांग आगाशे. सोबत स्नेहल पावरी, अनिक सागवेकर, संजना तारी आदी.
---
उद्योगधंद्यासाठी मेहनत, सातत्य आवश्यक
गौरांग आगाशे ः जांभेकर विद्यालयात बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी उद्योजक म्हणून पुढे यावे, यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी व सातत्य आवश्यक आहे. आजच्या जागतिक स्तरावर उद्योगधंद्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्ये ओळखून त्यांचा विकास करावा, असे प्रतिपादन उद्योजक गौरांग आगाशे यांनी केले.
सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गौरांग आगाशे यांचे पुष्परोपटे देऊन मुख्याध्यापिका संजना तारी यांनी सत्कार केला. हस्तकला व चित्रकला प्रदर्शनाचे विशेष अभिनंदन आगाशे यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेत हस्तकला व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, कल्पकतेचा व मेहनतीचा ठसा उमटला. संजना तारी यांनी केलेल्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशाला नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथींची ओळख स्नेहल पावरी यांनी करून दिली.
वार्षिक अहवालाचे वाचन शिक्षक राजेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमात इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कियांश गोरीवले याने साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा अभिनय विशेष आकर्षण ठरला.
------
विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रमुख अतिथी गौरांग आगाशे यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये साहिल देवरुखकर, आस्था बहुतुले, सिद्धी बारगोडे, ओम खेडेकर, आर्यन चव्हाण, दूर्वांग शेलार, आर्या दरडे, अथर्व राडीये, मनस्वी ठीक, आलिशा कोळंबेकर, श्रेया तुळसकर, निधी शेवगण, श्रेया पांगारकर, गौरी परब, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारी अदिती सागवेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.